रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून चालकाचा मृत्यू - टायगर ग्रुपच्या सहकार्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.🚨🙏🐯
रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून चालकाचा मृत्यू - टायगर ग्रुपच्या सहकार्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.🚨🙏🐯 रोडरोलरवरून रस्ता बांधकामाच्या दिशेने जात असताना अचानक रोडरोलरच्या खाली आल्याने चालकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी सुभाषनगर- आपापल्ली मार्गावर घडली. विनोद मारोती कुमरे (45) रा. बोथली ता. सावली जि. चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे. अहेरी तालुक्यातील आपापल्ली गावाजवळ रस्त्याचे काम सुरु आहे. अशातच सकाळच्या सुमारास चालक विनोद कुमरे हा रोडरोलर घेवून सुभाषनगर येथून आपापल्ली येथे जात होता. दरम्यान, रोडरोलर रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात उतरला. रोडरोलरवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात विनोद खाली पडला व रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलिसांनसह टायगर ग्रुपचे सदस्य घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. "माणसाच्या जन्मापासून ते अंत पर्यंत साथ देणारा हे टायगर ग्रुप🙏 आहे"